त्सुनामी म्हणजे काय ?
खुलासा: त्सुनामी म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरीत होते त्यावेळी निर्माण होणार्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात. त्सुनामी हा जपानी शब्द असुन त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" असा हा शब्द कोळ्यांत प्रचलीत होता. मासेमारी करुन परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे पण समुद्रात लाटा दिसत नसत त्यामुळे हे नाव देण्यात आले. किनार्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते पण लांबी जास्त असते त्यामुळे त्या दिसून येत नाहीत.२००४ मध्ये आग्नेय् आशियात त्सुनामी आली होती.